भुसावळातील ३९ व्यक्तींना तालुका बंदी – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे –

भुसावळ – येत्या नऊ सप्टेंबर पासून आपल्या राज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे हा गणपती उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भुसावळ उपविभागातून आतापर्यंत सीआरपीसी 144 /3 खालील तरतुदीनुसार काही प्रतिबंधक आदेश लागू व्हावे तसेच काही व्यक्तींना भुसावळ शहर व भुसावळ तालुका सीमा हद्दीत येण्यास प्रतिबंध व्हावे या दृष्टीने 39 व्यक्तींचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे हे प्रस्ताव साधारणतः अकरा दिवस संबंधित व्यक्तींना भुसावळ शहर तसेच भुसावळ तालुका हद्दीत मनाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहे

प्रस्ताव साधारणपणे अवैद्य दारू तयार करणारे तसेच अवैद्य दारू विक्रेते यांच्याकडून गणपती उत्सवाला गालबोट लागू नये त्यामुळे या व्यक्तींचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहे तसेच त्यांना नोटीसही देण्यात आलेले आहे नोटीस बजावणे करण्यात आलेली आहे बजावणे सुरू आहे 9 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या आजारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात संबंधित प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहे. याशिवाय हा उत्सव शांततेत साजरा होण्याकरीता या दृष्टीने वेगवेगळे कलमानुसार जास्तीत जास्त कारवाई पोलीस करीत आहे.