भुसावळ – भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्यावर भुसावळातील नाराज शिवसैनिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नारायण राणे यांच्या फोटोची आरोग्य तपासणी केली. वारंवार वायफळ बोलणार्या नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप करीत त्यांच्या प्रतिमेला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला शिवाय राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून शहरात जल्लोष केला.
आंदोलन प्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, सुभाष चौधरी, नितीन सोनवणे, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, निलेश महाजन, माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेवक अॅड.नरेंद्र लोखंडे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, स्वप्नील सावळे, पवन नाले, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बर्हाटे, तालुका संघटिका भुराताई चव्हाण, युवासेना तालुका अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष मनोज पवार, अल्पसंख्याक शहरप्रमुख शेख मेहमूद, शाखाप्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, राजेश ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.

अष्टभुजा देवी मंदिराजवळ शिवसेनेतर्फे फटाके फोडून जल्लोष ; –
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्याने पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केल्यानंतर अष्टभुजा देवी मंदिराजवळ शिवसेनेतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. नारायण राणेंच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. पोलिसांच्या कार्यपद्धती बाबतीत भाजप नेते शंका घेत असल्याचा राग सुद्धा शिवसैनिकांनी व्यक्त केला.


