भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच तालुका पोलीस स्टेशन यांना आयएसओ मानांकन प्रमाण पत्र प्राप्त ;

भुसावळ – येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तालुका पोलीस स्टेशन यांना मूल्यांकन परिक्षणात आयएसओ मानांकन प्रमाण पत्र बहाल करण्यात आले. मानांकन पत्र प्राप्त झाल्याबद्दल डीवाएसपी सोमनाथ वाघचौरे व पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेसह संपूर्ण टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 19 ते 21 ऑगष्ट 2021 दरम्यान आय एस ओ पथक अधिकारी यांनी नुकतीच भेट देवून येथे कार्यालया मार्फत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, कार्यालयातील अभिलेखांचे अध्यावती करण/ अभिलेखाचे जतन करणे, मुददेमाल जतन करणे , कार्यालयातील भौतीक सुविधा व पोलीस स्टेशन इमारतीतील तसेच परिसरातील स्वच्छाता, पोलीस स्टेशन आस्थापणे वरील अंमलदार यांना व देण्यात येणाऱ्या सुविधा, सामाजिक पोलीसींग, पोलीस स्टेशन मधील तपास कार्य व गुन्हयातील जप्तं मुददेमाल व्यवस्थीत ठेवणे, कायदा सुव्यवस्था आदी बाबीवरील मुद्यावर परिक्षण करुन आज मंगळवार 24 ऑगष्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ भाग, तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला यांना आय एस ओ मानांकन प्रमाण पत्र बहाल करण्यात आले आहे.


सदर आय एस ओ मानांकन प्रमाण पत्राकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तसेच कार्यालयीन स्टॉफ, त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , सपोनि रुपाली चव्हाण व अमोल पवार , आणि पोलीस स्टॉफ कर्मचारी यांच्या अथक परिश्रम व सहकार्य घेतले आहे.