राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाआघाडी जिल्हा सरचिटणीस पदी संगीता भामरे ;


जळगाव:-
वंचित बहुजनांच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीता भामरे यांनी काही दिवसापूर्वी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यावेळेस निश्चित होते की संगीता भामरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याची महिला आघाडीचे जबाबदारी देणार येणार आहे आज रोजी झालेल्या जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संगीता भामरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी प्रशस्तीपत्र देऊन केली यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडीने भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी उपसभापती अशोक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे , शहराध्यक्ष नितीन धांडे ,युवक शहराध्यक्ष रंजीत चावरीया ,नगरसेवक दुर्गेश ठाकुर सचिन पाटील ,शेतकी संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, संचालक गजू सरोदे ,एस आर पाटील ,राजेंद्र जोशी ,कैलास पाटील ,राजेंद्र भामरे ,यांनी अभिनंदन केले असून विविध क्षेत्रातून संगीता भामरे यांच्यावर नियुक्ती बद्दल शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे