भुसावळ डीआरएम कार्यालयातील लाचखोर मंडळ अभियंत्यांसह ओएसला 20 पर्यंत सीबीआय कोठडी –


भुसावळ – मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना दोन लाख 40 हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारताना नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दालनातच अटक केली होती.

दरम्यान संशयीत आरोपींना मंगळवार दोनांक17रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे