वरणगाव – येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात माजी सैनिक तथा माजी विद्यार्थी कैलास माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला .

याबाबत सविस्तर वृत्त असे की आपल्या भारत देशाचा 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी वरणगाव येथील माजी सैनिक तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री कैलास त्रंबक माळी सेवानिवृत्त नायक भारतीय सेना यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली, प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री संदीप मधुकर चौधरी उपस्थित होते यावेळी श्री. कैलास माळी यांचा व विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा बी एस एफ चे जवान शेख कयूम शेख फयुम यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. किशोर झोपे , जॉईंट सेक्रेटरी श्री शरद चौधरी, संचालक श्री बाळकृष्ण धनगर , संचालिका सौ ज्योती अवतारे, विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री सी एस अवतारे सर , श्री आर आर महाजन सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री एसटी जावळे सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एल नेमाडे सर , पर्यवेक्षक श्री. बी ए पाटील सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. संगीता चौधरी मॅडम व त्यांचे सर्व कर्मचारी तसेच श्रीनाथ इंग्लिश प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर व त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग ध्वजारोहणास उपस्थित होते.


