महिला क्रिडा मंडळ भुसावळतर्फे रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा :

भुसावळ –
रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्य दिन
महिला क्रिडा मंडळ भुसावळच्या सभासदांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे यांंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर दरवर्षी प्रमाणे सर्व सभासदांनीं देशभक्तीपर गाणे सादर केले . यावेळी सौ रजनी सावकारे यांनीही अतिशय सुंदर गाणे सादर केले.
यावेळी अध्यक्षा सौ. आरती चौधरी, सचिव सौ. लता होसकोटे, खजिनदार सौ. जयश्री ओक,सौ सौ.स्वाती नाईक, सौ.प्रगती ओक,सौ. प्राची राणे, सौ.लता ढाके, सौ.प्रभा पाटील, सौ.माधुरी गुजर, सौ.अनिता कवडीवाले, सौ.वीणा ठाकूर,सौ. माधुरी गव्हाळे , सौ.सुनीता पाचपांडे, सौ.वैशाली भगत. श्रीमती प्रमीला नेमाडे, व चारु महाजन इत्यादि उपस्थित होत्या . कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले .