विश्व क्लिनिक व शिवसेना सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सुवर्णप्राशन शिबिर संपन्न : सुमारे 1573 बालकांनी घेतला लाभ :

नाशिक सातपुर – कोविड १९ च्या पार्श्वभूमिवर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ” विश्व क्लिनिक व शिवसेना सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सुवर्णप्राशन शिबिर 15 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आले . कोरोनाची नियम पाळून जवळपास १५७३ मुलांना डोस दिले गेले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, शिवसेना गटनेते विलास आण्णा शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वृषाली सोनवणे यांनी केले त्या वेळेस त्यांनी सुवर्ण प्राशनाने होणारे फायदे व महत्व सविस्तर सांगितले. तसेच हा उपक्रम मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दर महिन्याच्या गुरुपुष्य मुहूर्तावर वर्षभर मुलांसाठी मोफत घेणार असल्याची ग्वाही यावेळी दिले . आभार नरेश सोनवणे यांनी मानले तर सुत्रसंचालन विजय बुरुकुल यांनी केले .
यावेळी तज्ञ डॉ. शीतल सुरकर, डॉ.मंजुषा व्यवहारे, डॉ.सुप्रिया चांडवडकर, डॉ.अनुपमा मराठे ह्या टीमने सहकार्य करून महत्वाची कामगिरी बजावली .

तर या कार्यक्रमास उपशहरप्रमुख लोकेश गवळी,देवा जाधव,दिपक मौले, जी एस साळवे, अल्काताई गायकवाड, विभाग प्रमुख युवराज धात्रक, वैभव ढिकले, उपविभागप्रमुख चेतन उगले, लखन कुमावत, अशोक पारखे, रवी देवरे ,बाळासाहेब,म्हस्के सर, अरुण घुगे, स्वप्नील आव्हाड,मंगेश पवार, मयुर जुनरे, संदिप भोजने, बाळा आव्हाळे, पंकज गुजर, अविनाश सोनवणे,सत्यजीत झाम्बरे, पलाश,राहुल साळुंखे, बापु सावकार, ज्ञानेश्र्वर पवार, राहुल डोंगरे, गोल्डी गायकवाड, स्वप्नील वडनेरे ,अहिरे सर ,अनुपमा झाम्बरे, पगार ताई,लीलावती क्षिरसागर, आशा चव्हाणके,पूर्वा निकुंभ,ज्योस्तना जाधव,बेबी खोळंबकर,विश्वराज सोनवणे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.