भुसावळचे नूतन डीआरएम एस.एस.केडिया यांनी पदभार स्विकारला ;


भुसावळ : भुसावळ विभागाचे नूतन डीआरएम एस.एस.केडिया यांनी तत्कालीन डीआरएम विवेककुमार यांच्याकडून बुधवारी पदभार स्वीकारला आहे . प्रसंगी नूतन डीआरएम केडिया यांचे स्वागत करण्यात आले.
केडिया हे 1990 च्या बॅचचे आयआरएसई अधिकारी असून त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून एम.एम.एम इंजिनिअरींग कॉलेजमधून सिव्हील अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे व 1989 मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. झांसी आणि नागपूर विभाग, मुंबई उपनगर, मध्य रेल्वे मुख्यालयाच्या दक्षता विभागात कामकेले असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले. ते टोरंटो (कॅनडा), लंडन, रोम आणि मोनोपोलाय (इटली) येथे जाऊन आले रेल्वे ट्रॅक, पूल आणि इमारतींचे बांधकाम, तसेच बेलापूर सीवूड-अर्बन लाईन, परेल टर्मिनस आणि अशा प्रकारचे मोठे प्रकल्पाचा त्यांना अनुभव आहे. भुसावळ येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते मध्य रेल्वेचे मुख्य ब्रिज अभियंता म्हणून कार्यरत होत.