भुसावळात 9 ऑगस्ट क्रांतीदिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद –


भुसावळ – शहरातील श्री नगर मित्र मंडळातर्फे 9 ऑगस्ट क्रांतीदिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन समाजसेवक व माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या संयोजनाने करण्यात आले. या शिबिरात 115 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी श्री नगर येथे परीसरातील ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर समाजसेवक दीपक धांडे यांच्या संयोजनाने करण्यात आली. श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर भुसावळ , नवकार हॉस्पिटल अ‍ॅडव्हान्स ऑर्थोपेडिक अ‍ॅण्ड डेंटल केअर व नेत्रम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासणी केली. शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी , इसिजि , रक्तदाब, रक्तातील साखर, हाडांचे आजार आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना गंभीर आजाराचे निदान झाल्याने त्यांना त्वरीत श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. 6 रुग्णांना मोती बिंदू शस्रक्रिया आवश्यक असल्याचे निदान झाले तसेच अनेकांना हाडांच्या व्याधी असल्याचेही निदान झाले. डॉ.संतोष पाटील, डॉ.प्रितेश कोठारी व डॉ सुनील मेश्राम यांनी रुग्ण तपासणी केली.आरोग्य शिबिरामुळे वृद्धांना मोठा दिलासा मिळाला .
शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक दीपक धांडे, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, निखील चौधरी, निलेश भारंबे, गणेश लोखंडे, शुभम दराडे, गोकुळ बाविस्कर, राकेश देशमुख व गिरीश बाविस्कर यांनी परीश्रम घेतले. शिबिर स्थळी बबलू बर्‍हाटे, देवेंद्र पाटील , सतीश सपकाळे यांनी सदिच्छा भेट दिली