भुसावळ शहरात अज्ञातांचा तरुणावर धारदार शस्त्राने वार –

भुसावळ – शहरातील वांजोळा रोडवरील रेणुका माता मंदिराच्या पाठीमागे अज्ञाताने तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज रात्री ८ वाजेचे सुमारास येथे घडली.

शहरातील वांजोळा रोडवरील रेणुका माता मंदिराच्या पाठीमागे
रात्री 8 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी येथील रहिवासी बाबा फोमचे संचालक नवीन किशोर कुकरेजा वय 30 मोटरसायकलने गोडावून वरून येत असतांना काही अज्ञात इसमांनीं मोटरसायकल वर येऊन नवीन कुकरेजा यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला यात नविन कुकरेजा गंभीर जखमी झाल्याने त्वरीत येथील रिदम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून जखमीवर उपचार सुरू आहे.
दरम्यान वृत्त कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,सपोनि हरीष भोये, पोना.रविंद्र बिऱ्हाडे,पोकॉ योगेश महाजन अशांनी भेट दिली