श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव गोगामेडी उद्यापासून 3 दिवस महाराष्ट्र दोऱ्यावर ;

भुसावळ –
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव दादा गोगामेडी उद्या दिनांक ७ पासून 3 दिवस महाराष्ट्र दोऱ्यावर येत आहेत .
त्यांचे सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिह कट्यार , प्रदेश अध्यक्ष अर्जुनभैया ठाकूर असतील . त्यांचा नियोजित दौरा
नागपूरहुन सकाळी साडेसातला निघतील, चांदुर रेल्वे 10:13 ला कार्यकर्त्यांच्या भेटी,अकोला येथे दुपारी 1:30 वाजता कार्यकर्त्यांच्या भेटी , खामगावला 3 वाजता आगमन व कार्यकर्त्यांच्या भेटी मलकापूर संध्याकाळी 6 वाजेला आगमन कार्यकर्तेच्या भेटी, 7 ला मुक्ताईनगर सत्कार व भेटी , रात्री 8 ला भुसावळ येथे नाहटा चौफुली येथे उड्डाण पूलाखाली आगमन व सत्कार समारंभ तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी समाजबांधवांशी चर्चा व पुढे जळगाव , पारोळा येथे रवाना तेथून पुढील कार्यक्रम नाशिक साठी रवाना होतील असे
करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत,जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंग पाटील, युवा जिल्हाध्यक्ष निखील राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .