भुसावळ –
महिला पतंजली व पर्यावरण सखीमंच भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगष्ट रोजी जडी बूटी दिवस आचार्यश्रीं यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला . यानिमित्त साकेगाव येथे औषधी वृक्षवाटप करण्यात आले.

कार्यक्रमास महिला पतंजली योग समिती भुसावळ राज्य कार्यकारणी सदस्य महानंदा पाटील , भारत स्वाभिमान अध्यक्ष भवरलाल प्रजापती, समाजसेविका सौ आरती चौधरी ,जिल्हा युती प्रभारी
राजश्री बादशहा, संवाद प्रभारी
वर्षा लोखंडे ,तहसील युवती प्रभारी रूपाली पाटणकर , तहसील मीडिया प्रभारी सुनंदा शिरसाठ , पर्यावरण सखी मंचाच्या तालुका अध्यक्ष रेखा सोनवणे, शहर अध्यक्ष शालिनी वाडेकर, साकेगाव सरपंचा योगिता सोनवणे व अनिता ठाकरे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महानंदा पाटिल यांनी ओमकाराच्या नादाने करून वातावरणात सकारात्मक उर्जा निर्माण केली . यावेळी आचार्य शिरोमणी आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण महाराज यांचा कार्य महिमा सांगून जडीबुटी औषधी झाडां विषयी माहिती दिली .
तर सौ आरती चौधरीं यांनी स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून
गांडूळ खत कसे बनवावे तसेच कोणत्या औषधी वनस्पती पासून कोणते फायदे होतात याबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले . भवरलाल प्रजापती यांनी एक्यूप्रेशर पॉइंट संबंधी विस्तृत माहिती दिली. तसेच कोणते पॉईंट दाबल्यामुळे कोणते आजार बरे होतात या विषयाचे त्यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी महिला पतंजली भगिनींनी घरी तयार केलेली औषधी रोपे सर्वाना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावीरीत्या सूत्रसंचालन वर्षा लोखंडे यांनी तर रूपाली पाटणकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास आशा वर्कर यांचेसह महिला पतंजली व पर्यावरण सखीमंचच्या सर्व भगिनी सदस्यासह
गावातील महिला व नागरीकांचा चांगला सहभाग लाभला.


