भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त सोशल डिस्टन्सचे पालन करीत मान्यवरांनी थोर पुरूषांच्या कार्याला उजाळा दिला. विविध संस्था, सामाजिक संघटनां तर्फेही थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी
भुसावळ : शहरातील नसरवांजी फाईल भागातील राजीव गांधी वाचनालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा उपाध्यक्ष जे .बी.कोटेचा, राजेंद्र पटेल, आर.जी.चौधरी, डॉ.नईम मझहर, डॉ.सुवर्णा गाढेकर, जगपालसिंग गील, सलीम गवळी, शेख हमीद, अकील शाह, विनोद शर्मा, संदीप देवडा, गोविंदा पाटील, विनोद शर्मा, सचिन डेलिवाला, जॉनी गवळी, सायरा बानो, यास्मीन बानो, हमीदा गवळी, शीला परदेशी, प्रदीप नेहेते, कैलास चौधरी आदींची उपस्थिती होती.
अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ
भुसावळ : अण्णाभाऊ साठे नगरात भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, भुसावळ भाजप शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजु खरारे, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, ऑल इंडिया एस.सी.एस.टी ऑपरेटिंग ब्रांच अध्यक्ष रेल्वे ईसीसी बँक डिलिगेट वाल्मिक देहाडे व शहर उपाध्यक्ष रवींद्र दाभाडे, शहर उपाध्यक्ष संतोष ठोकळ, वॉर्ड अध्यक्ष अजय लोखंडे, मुकेश कांबळे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अण्णाभाऊ साठे नगर मित्र परीवार व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल तायडे व उपाध्यक्ष संतोष ठोकळ यांनी सहकार्य केले.



