रोझोदा – येथील रहिवासी नाव प्रशांत वासुदेव मेढे या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात रात्री १ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की रोझोदा येथील केळीचे व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते वासुदेव धनजी मेढे यांचा मुलगा नामे प्रशांत वासुदेव मेढे या तरुणाने नैराश्येतून रात्री मोबाईल वरती ‘माझे शेवटचे स्टेटस’ असे अपलोड केले आहे घरातील सर्व झोपलेले असतांना गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह रावेर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला . मृताच्या पश्चात आई ,वडील ,आणि एक बहीण असा परिवार आहे.



