जगन मामाच्या निधनाने हळहळले जळगावकर , तृतीयपंथांच्या प्रथांना फाटा देत झाले अंतिम संस्कार ;

जळगाव (उज्वला बागुल ) – शहरातील प्रसिद्ध तृतीयपंथी गुरू तथा गोलाणी मार्केट मधील रहिवासी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
जगन मामाच्या जाण्यामुळे जळगाव शहरातील किन्नर समाजासह सर्वच नागरिकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

जळगाव शहरातील किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर रहिवासी होते.
मागिल तीन महिण्यापासून ते आजारी होते. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याच्या राहात्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या जाण्यामुळे जळगाव शहरातील किन्नर समाजात शोककळा पसरली आहे.

गोलाणी मार्केटिंग मध्ये जगन मामा यांच्या वर प्रेम करणारे हितचिंतक जगन मामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते .किन्नररांची गोपनीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मोडीत काढीत जगन मामांवर अंत्यसंस्कार करण्यात आले .अंत्यसंस्कारात तृतीयपंथी अक्षरशः ढसा ढसा रडताना दिसले .तृतीय पंथीयांचे अंत्यसंस्कार गोपनियरीत्या करण्याची पद्धत शेकडो वर्षांपासून आहे .एव्हढेच नव्हे तर हा अंत्यसंस्कार पाहणाऱ्या व्यक्तीला देखील नशीबवान समजण्याची पद्धत आजही समाजात आहे .मात्र जगन मामा यांच्या लोकप्रियतेने जळगावात आज सर्व प्रथांना फाटा देत नवीन आदर्श निर्माण केला आहे