भुसावळ – वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच दीपनगर येथे प्रदेश कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली.कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर उपस्थित होते. सदर बैठकीत महावितरण कंपनी मर्यादीत जळगांव झोनच्या अध्यक्ष पदी शेख शब्बीर ईस्माईल यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.नियुक्ती नंतर शेख शब्बीर म्हणाले की जळगाव जिल्ह्यात वंचित बहुजन संघटने तर्फे प्रत्येक वंचित कंत्राटदाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे जिल्हात संघटन मजबूत करण्याचे गाव्ही त्यांनी दिली .प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रीय पदाधिकारी उपाध्यक्ष मन्साराम कोळी,सचिव प्रकाश तायडे, सहसचिव नारायण झटके,कोषाध्यक्ष संतोष तेलंग,संघटक उस्मानखान पठाण, तोसिफखान पठाण उपस्थित होते तर दीपनगर शाखाध्यक्ष- राजगोपाल तेलंग,सचिव रामचंद्र तायडे, सुरेश टाक,संजय अडकमोल,शकील खान, नितीन हिवाळे,रविंद्र सरदार,संजय रावलकर, संदीप पाटील,सुरेंद्रसिंग ठाकुर, दिपरत्न तायडे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संघटनेचे सल्लागार आर.आर.आव्हाड मानले.



