सांगली : राज्यभरातील दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मात्र ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, असेही त्यांनी सांगली शहरातील पत्रकार परीषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी, दुकानाच्या वेळा वाढवून द्या, अन्यथा दुकाने उघडू असा व्यापार्यांनी इशारा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच उत्तर दिलं.

रात्रीपर्यंत निघणार आदेश
नागरीकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाच आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसर्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री 8 पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथं रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


