मुक्ताईनगर : नुकतेच कोकणात पावसाने दरडी कोसळून जीवित व वित्त हानी झाल्याच्या घटना ताज्या असून या घटनांची मुक्ताईनगर तालुक्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसिलदार श्वेता संचेती , वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेख , उपअभियंता सावखेडकर , नगरपंचायत चे अभियंता सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक जग्रवाल यांचेसह संपूर्ण प्रशासन घेऊन शहरातील टेकडी व कराडी वरील धोकादायक घरांची पाहणी केली. आणि तात्काळ ऑडिट करण्याच्या सूचना केल्या तसेच मुक्ताईनगर शहरातील व तालुक्यातील अनेक गावांत टेकडीवर तसेच कराडी वर असलेल्या घरांचे तात्काळ ऑडिट करून संबंधित रहिवाशांना संरक्षण होईल अशा उपाय योजना कराव्यात यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याशी देखील आमदारांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला .

प्रसंगी शहर प्रमुख गणेश टोंगे , शहर संघटक वसंत भलभले, गटनेते राजेंद्र हिवराळे, पियुष मोरे , पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, माजी उपसरपंच जाफर अली, मुशीर मणियार , शकुर जमदार, सलीम खान, दिलीप पाटील , नगरसेवक संतोष मराठे, संतोष (बबलू) कोळी , आरिफ आझाद , गोपाळ सोनवणे , युनूस खान, नुरमोहम्मद खान, संतोष माळी, पप्पू मराठे, लक्ष्मण बोरखेडे, कडू गावंडे , रितेश सोनार ,सहायक प्रवीण चौधरी , प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.


