वरणगावात बेशर्मीचे झाड खड्ड्यात लावून आंदोलन – पहिल्याच पावसात रस्ता उखडला :


वरणगाव : गेल्या दोन महिन्यांपूर्वीच वरणगाव स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडल्याने शासन निधीचा व पर्यायाने जनतेच्या पैशांचा चुराडा झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी वरणगावातील स्थानिक पदाधिकार्‍यांनी ठेकेदाराचा निषेध नोंदवत बसस्थानक चौकातील खड्ड्यांमध्ये बेशर्मीचे झाड लावून ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष मनोज कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पूभाई जकातदार, सुधाकर जावळे, महिला शहराध्यक्ष रंजना पाटील, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, युवक तालुका उपाध्यक्ष सागर सरोदे, ओबीसी विभाग शहराध्यक्ष हिमालय भंगाळे, ओबीसी विभाग चिटणीस प्रशांत बोंडे, अहेसान अहमद, राजू चौधरी (मिट्टी), इफ्फा मिर्झा, महेश सोनावणे, ओबीसी विभाग उपाध्यक्ष उल्हास पाटील, रवींद्र पाटील, अनिल चौधरी, प्रकाश पाटील, मयूर चौधरी, आकाश झोपे, लखन चौधरी, कौस्तुभ पाटील, दिलीप कोळी, ओम दिलीप गायकवाड व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..