भुसावळातील प्रभाग 18 मध्ये हायमास्टचा प्रकाश –

भुसावळ : भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मधील हायमास्ट लाईट बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी ही बाब लक्षात घेता पदरमोड करीत प्रभागातील नागरीकांच्या सोयीसाठी पथदिवे बदलल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रसंगी सुभाष ठाकूर, चंद्रकात कापडणे, सीताराम ठाकूर, अनिल पाटील, सुरेश वाणी, विकास देवरे, सागर पत्की, सागर वाणी, हर्षल वाणी हर्षद वर्मा, अभिषेक फेंगडे आदींची उपस्थिती होती.