जळगाव जिल्ह्यात आज ९ बाधित रूग्ण आढळले ;


जळगाव,

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात ०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना रिपोर्टनुसार भुसावळ तालुक्यात १ , चोपडा २, पाचोरा २ आणि चाळीसगाव ४ असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

तर उर्वरित १२ तालुके निरंक आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५८८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले त्यापैकी १ लाख ३९ हजार ९३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.