जळगाव उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार : मुख्य आरोपीला अटक ;

जळगाव : जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी महेंद्र राजपूत यास पोलिसांनी अटक केली आहे.
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना 25 जुलै रोजी रात्री घडली होती. या गुन्ह्यात रामानंद नगर पोलिसांनी संशयीत आरोपी किरण शरद राजपूत व उमेश पांडुरंग राजपूत या दोघांना पोलिसांनी सोमवारीच अटक केली असून मंगळवारी रात्री गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी (एम.एच.48 एफ 1422) सह मुख्य आरोपी महेंद्र राजपूत याला म्हसावद जवळून अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.