खंडाळा ग्रा.पं भ्रष्टाचार प्रकरण: भुसावळ गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी नेमणूक मान्य नाही- राष्ट्रीय दलित पॅंथरची मागणी ; निवेदनानुसार चौकशी करण्यात यावी अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा,

खंडाळा ता. भुसावळ (वार्ताहर):- खंडाळा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपये चा भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय दलित पॅंथरने काही दिवसापूर्वी धरणे आंदोलन (उपोषण) केले होते. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात चौकशी करून कार्यवाही करतो असे लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते. मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा प)यांच्या पत्रात तक्रारदारांच्या नावाचा उल्लेख नसल्याने व भुसावळ गटविकास अधिकारी यांची नियुक्त चौकशी अधिकारी नेमणूक मान्य नसल्यामुळे संघटनेने दिलेल्या निवेदना नुसार चौकशी करण्यात यावी अशी अन्यथा तूर्त स्थगित झालेले उपोषण पुन्हा सुरू करू असा इशारा राष्ट्रीय दलित पॅंथर यांनी दिला असून पॅंथर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना निवेदन दिले आहे.


सविस्तर असे की २२/७/२०२१ रोजी प्राप्त पत्रामध्ये मूळ तक्रारदारांची नावे नसून चौकशी कामी हजर राहण्याचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख नसल्यामुळे व भुसावळ गटविकास अधिकारी हे स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी होऊन सुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल करीत नाही तसेच रोजगार हमी योजनेचाही खोटा चौकशी अहवाल दिल्यामुळे हे चौकशी अधिकारी म्हणून आम्हाला मान्य नसून आपल्या स्तरावरून वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करून व चौकशीकामी तक्रारदारांना हजर राहण्याचे आदेश देऊन खंडाळा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराच्या योजनानिहाय १४ व्या वित्त आयोग, दलित वस्ती सुधारक, रोजगार हमी योजना, आणि स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी झालेली असून अंती सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व उर्वरित योजनांची चौकशी करून संबंधितांवर आम्ही प्रत्येक तक्रारीचे निवेदन निवेदनात मागणी केलेल्या कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी व स्वच्छ भारत मिशन या योजनेची चौकशी होऊन सुद्धा गट विकास अधिकारी हे गुन्हे दाखल करीत नसल्यामुळे यांची चौकशी नेमणूक अधिकारी म्हणून आम्हाला मान्य नाही म्हणून आपल्या स्तरावर चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्थगित झालेले उपोषण पुन्हा करण्यात येईल याची आपण गंभीर दखल घ्यावी असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे, शरद सुरवाडे, सुभाष जोहरे व राष्ट्रीय दलित पॅंथरच्या पदाधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा प ) यांना दिले .