- वरणगावात प्रभाग नऊ, दहा, आकरातील कार्यकर्त्यांना शिवसंपर्क अभियान प्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे मार्गदर्शन ;
वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे कार्य सामान्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा आणि आगामी होणाऱ्या वरणगाव नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी केले.
वरणगाव येथील प्रभाग क्रमांक नऊ, दहा आणि आकरातील कार्यकर्त्यांची बैठक रविवारी रात्री जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी झाली.

व्यासपीठावर शिवसेना जिल्हा कार्यालयीन उपप्रमुख उत्तमराव सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी सेट, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, अब्रार खान यांची उपस्थिती होती.
जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, वरणगाव शिवसेनेला पोषक वातावरण आहे शिवसेनेमध्ये तरूणांचा प्रवेश वाढत आहे. वरणगावातील सर्व समाजाने साथ दिल्यास येत्या निवडणुकीमध्ये वरणगाव नगरपालिकेवर भगवा फडकला शिवाय राहणार नाही, त्याला कारण असे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या कार्य आपण सर्व महाराष्ट्र बघत असल्याचेही महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील यांची साथ तसेच मुक्ताईनगर चे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड भुसावळ तालुक्यात सुरू आहे. त्याचबरोबर वरणगाव शहरात आपणा सर्वांच्या सहकार्याने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने भगवा फडकवणे शक्य होणार आहे. वरणगावातील 25 कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वरणगावसाठी निधी दिला आहे. परंतु येथील आमदार संजय सावकारे आणि येथील भाजपच्या लोकांनी पाणी पुरवठा योजेनेच्या भूमिपूजनाची इतकी घाई कशासाठी…शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी निधी दिला आणि त्यांना न बोलावता भूमिपूजन करून घेतले. इतकी घाई कशासाठी जनतेला सर्व माहिती आहे, असू द्या त्यांनी भूमिपूजन केले. आपण आता लोकार्पण करू असेही जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सरसंधान केले.
प्रा उत्तमराव सुरवाडे यांनी देखील शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद पंथभेद मानला जात नाही. इथे फक्त एकच शिवसैनिक हीच आपली जात धर्म कोणत्याही समाजाचा माणूस शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेमध्ये काम करण्याची चिकाटी तरुणांनी धरायला पाहिजे. येणाऱ्या काळात वरणगाव नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे कामे करा असेही प्रा सुरवाडे यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, अब्रार खान यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी महिला आघाडीच्या संघटिका योगिता सोनार, आबा सोनार, नितीन पाटील, किरण माळी, अतुल पाटील, प्रशांत पाटील, रोहित मुळे, कैलास पाटील, कृष्णा पाटील, सम्राट मराठे, पिंटू नेहते, दिपक पाटील, कृष्णा पुजारी, भुषण बाविस्कर, विजय कुंभार, सागर लोंढे ळ, सागर वाघ, राजु परसे, रोहन बोरसे, सुरेश चौधरी, राहुल बावणे, शिरू माळी, दत्तू भालेराव, अंकुश बोन्डे, नरेश पाटील, निलेश सुरळकर यांच्यासह प्रभाग नऊ, दहा आणि आकरा मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.


