भुसावळ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे निधी संकलन फेरी काढण्यात येवून पुरग्रस्तांच्या मदतीकरीता मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करण्यात आला .
आज दिनांक २७ जुलै २०२१ मंगळवार रोज़ी सकाळी शहरातील स्टेशन परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत फेरी काढण्यात आली . सदर फेरी स्टेशन रोड , मॉर्डन रोड , सराफ बाजार , मार्गे वसंत टॉकीज रोड , गांधी पुतळया पर्यंत काढण्यात येवून दुकानदार, व्यापारी, हात गाडीवाले बांधव यांच्याकडून मदत निधी गोळा करण्यात आला. याावेळी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदतीकरीता निधी दिला .तदनंतर सदर निधीचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याकरीता सुपुर्द करण्यात आला .

यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख जगदीश कापडे, शहर प्रमुख निलेश महाजन , शेख ईलयास सर ,नगरसेवक मुकेश गुंजाळ ,उपशहर प्रमुख राकेश खरारे,शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) विभाग प्रमुख अरुण साळुंखे, शिवसैनिक जाकीर पेंटर ,धीरज वरढ़ोंणकर, शिवाजी दाभाडे, अशोकराव हिंगणे,समीर तड़वी, यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.


