खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाफ़डकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी 2015 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप या ग्रामसेवकावर आहेत . गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची पाचोरा तालुक्यात बदली झाली असून सध्या अतिरिक्त पदभार एक ऑगस्ट च्या पुढे देण्यात येईल. खंडाळा ग्रामसेवकांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे गावात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे

.
गुन्हे नोंद होतील या भीतीने ग्रामसेवकाने बदली करून घेतली :- प्रेमचंद सुरवाडे (ग्रा प सदस्य) खंडाळा ग्रामपंचायत मध्ये सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक यांनी सण 2015 ते 20 मध्ये लाखो रुपयांचा संगनमत करून भ्रष्टाचार संगनमताने झाला
आहे . याबाबत मी व राष्ट्रीय दलित पँथर चे पदाधिकारी यांनी मागील आठवड्यात संबंधितावर गुन्हा नोंद व्हावा म्हणून धरणे आंदोलन (उपोषण)केले यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात चौकशी करून कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले होते मात्र संबंधित ग्रामसेवक यांनी चौकशी करण्याचे आतच पळ काढला असल्याचा आरोप सुरवाडे यांनी केला आहे . तसेच मागील पंचवार्षिक मध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधितावर गुन्हे दाखल होतील व यांची जेलवारी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे


