शिवसंपर्क अभियानात कोरोनामुक्तीची हाक.- माझे शहर, कोरोनामुक्त शहरसाठी प्रयत्न करणार- बबलू बऱ्हाटे


भुसावळ –
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान हे केवळ पक्ष संघटना वाढीसाठी नाही तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. येत्या १२ दिवसात शिवसैनिकांनी प्रत्येक घरात पोहचत त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि घरा-घरात लसीकरण झाले का? कोणाचे लसीकरण व्हायचे आहे? कोणत्या आरोग्य सेवेची गरज आहे ? ही माहिती शिवसैनिकांनी गोळा करून लसीकरण मोहिमेला गती द्यावी असे आवाहन भुसावळ येथील अष्टभुजा देवी मंदिराजवळील कार्यक्रमात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. शहरात शिवसैनिकांनी कोरोना काळात रुग्णांना अनेक प्रकारे मदत उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य प्रशासनाच्या परिश्रमाने महाराष्ट्र आज कोरोनावर मात करीत आहे. मात्र यापुढे डेल्टा प्लस, झिका असे इतर विषाणूंची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे माझे शहर, कोरोनामुक्त शहर ही संकल्पना रुजण्यासाठी आवश्यक उपायांची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी यात मेहनत घ्यावी. शिवसैनिकांनी आपापल्या भागात जनजागृती करून सर्व योजना शहरातील सर्व भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील याकरिता प्रयत्न करावेत असे आवाहन भुसावळ शहरप्रमुख बबलु बऱ्हाटे यांनी के

.उपशहर प्रमुख पवन नाले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाराम प्लॉट भागातील ११० शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी केली. नवीन सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, उपतालुकाप्रमुख पप्पू बारसे, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपशहर प्रमुख पवन नाले, माजी नगरसेवक कैलास लोखंडे, प्रसिद्धी प्रमुख दत्तू नेमाडे, नामदेव बऱ्हाटे, गजानन निळे, हेमंत खंबायत, पवन मेहरा, हेमंत बऱ्हाटे, सुरज पाटील, शरद जैसवाल, विक्की चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.