चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले : पायलटचा मृत्यू : महिला पायलट जखमी –

चोपडा –
चोपडा तालुक्यातील वर्डी जवळील रानतलाव परीसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात होवून ते कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला असून सहकारी महिला पायलट जखमी झाली. वर्डी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या रानतलाव या परीसरात हेलीकॉप्टर कोसळले. शेतात काम करणार्‍यांनी मोठा आवाज ऐकल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैमानिक मृत झाल्याचे दिसून आले तर महिला पायलट जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. चोपडा तहसीलदारांसह पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.