भडगाव- वीर जवान शहीद निलेश सोनवणे यांना सीमेवर वीर मरण आले त्यांचेवर 13/7/2021 मंगळवार रोजी भडगाव येथे गिरणा नदीवर दुपारी 12:30 वाजता शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले .

शहीद वीर जवान निलेश यांची अंतिम यात्रा ज्या मार्गाने गेली त्या मार्गावर रस्त्याने दुतर्फा नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून वीर जवान शहीद निलेश सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली .
सकाळी 10 वाजता शहिद जवान यांचे पार्थिव भडगाव शहरात आल्यावर राहत्या घरी आणले त्यानंतर टोणगाव भागातुन पाचोरा रोड,तहसिल कचेरी समोरून मेनरोड,आझाद चौक दत्तमट्टी समोरून जेडीसी बॅके समोरून काकासट चौक,स्वामीसमर्थ मंदीर समोरून गिरणा नदीवर अंत्यविधी साठी आणले . शहिद जवान अमर रहे घोषणानीं परिसर दुमदुमला होता .जळगाव जिल्हातील सर्व देशभक्तांसह पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील.तहसिलदार सागर ढवळे,पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर,गटविकास अधिकारी रमेश वाघ,मुख्यधिकारी विकास नवाळे सह विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हातील तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रिनिडियल टि.ए.118 बटालियन भुसावळ युनिटच्या १२ जवानानी व जळगांव पोलिस मुख्यालयातील १५ पोलिस जवानानी ३ राऊंड हवेत फायरिंग करून शहिद निलेश सोनवणे यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली .


