स्मार्ट विलेज साकेगाव येथे लवकरच मोफत इंटरनेट सुविधांना प्रारंभ होणार – सरपंच ठाकरे
भुसावळ –
भारत सरकारने गावागावात इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा संकल्प केलेला असून त्यासंदर्भात साकेगाव ग्रामपंचायत मध्ये महा ई सेवेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांचा संपूर्ण सेट अप ग्रामपंचायत कार्यालयात उभारण्यात आलेला असून लवकरच महा-ई-सेवा केंद्र साकेगाव येथे सुरुवात होईल अशी माहिती महा-ई-सेवा प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांना सेट अप बसवताना दिली
दिनांक 12 जुलै रोजी महा-ई-सेवा केंद्राच्या इन्स्टॉलेशन करणाऱ्या टीमने ग्रामपंचायत कार्यालयात राउटर तसेच संपूर्ण सेट अप इन्स्टॉल करून लवकरच गावात वायरलेस वाय फाय सुविधा ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्या आरोग्य केंद्र अशा संपूर्ण प्रशासकीय विभागात दरम्यान तसेच ग्रामस्थांना मोफत सेवा
पुरविण्यात येईल अशी माहिती इन्स्टॉलेशन प्रसंगी उपस्थित अधिकारी वर्गाने प्रभारी सरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनवणे ग्रामपंचायत सदस्य गजानन पवार स्वप्निल सपकाळे कुंदन कोळी सुभाष सोनवणे गणेश कोळी पप्पू राजपूत सागर सोनवाल ऑपरेटर सनांसे मॅडमआदींना दिली
इंटरनेट सुविधा आज काळाची गरज असून या संपूर्ण सुविधांमुळे गावातील विद्यार्थ्यांचे व नव युवकांचे मनोबल उंचावणार असून गावातील मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून गावातील युवक जगाशी जोडला जाणार आहे त्यांची बौद्धिक व मानसिक उंची वाढेल याचा निश्चित फायदा संपूर्ण गावाला होईल असा विश्वास सरपंच ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे



