रावेरात गावठी कट्टया सह जिवंत काडतुस व आरोपी जाळ्यात ;


रावेर –
नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयीतासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्‍या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
यात रवींद्र राजाराम प्रजापती 31, कुंभारवाडा, रावेर याचाही समावेश आहे. या आरोपीच्या घरासह परीसराची झडती घेत असतांना पोलिसांना महेंद्र अर्जुन प्रजापती वय 25 याच्याकडे गावठी कट्टा व जीवंत काडतुसांचे मॅगेझीन आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
या प्रकरणी रावेरचे पोलीस कर्मचारी प्रमोद सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र अर्जुन प्रजापती आणि रवींद्र राजाराम प्रजापती, दोन्ही रा.कुंभारवाडा, रावेर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीआहे .
तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख गफूर शेख कादर आणि शेख ईस्माईल शेख ईसा हे करीत आहेत. दरम्यान, रवींद्र राजाराम प्रजापती यास नकली नोटांच्या प्रकरणातही आधीच अटक करण्यात आले आहे.