भुसावळ –
भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त गवसला असून तब्बल आठ महिन्या नंतर शुक्रवार, 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन पध्दतीने सभा होणार आहे. या सभेत 317 विषय अजेंड्यावर असून या सभेतील विषयांना मंजूरी मिळाल्यानंतर शहरातील विकासात्मक कामे करण्यास वेग येणार आहे.

याआधी पालिकेची सर्वसाधारण सभा 27 नोव्हेंबर 2020 रोजी झाली होती. या सभेनंतर आता आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सभा होत आहे. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे हे असतील. तर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची उपस्थिती राहिल.
या ऑनलाइन सभेसाठीचे अजेंडा नगरसेवकांना वितरीत करण्यात आला आहे. या सभेत शहरातील अनेक विकासात्मक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.


