सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या जळगाव शाखेचे उद्या उद्घाटन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ गेली ४ वर्षा पासुन समाज सेवेचे व पर्यावरण पुरक असे विविध उपक्रम भुसावळ व भुसावळ परिसरात राबवत आहे याच माध्यमातून समाज सेवेचे कार्य जळगाव शहरात सुद्धा करण्यासाठी
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ हीची दुसरी शाखा-जळगाव येथे सुरु होत आहे .
सदर कार्यालयाचे उद्घाटन वृक्षारोपणाने करण्यात येणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डाॅ.विवेक चौधरी सर (गजानन हार्ट अँड आय हाॅस्पिटल, जळगाव) यांचे हस्ते करण्यात येणार आहे . तरी सर्व सखींणी दिनांक १२/०७/२०२१रोजी
दुपारी १ ते २ यावेळेत श्रीमती. जया गजानन भंगाळे प्लाॅट नं २, चैतन्य नगर, उदय काॅलनी जवळ, ज्ञानेश्वर मंदिरा समोर, ख्वाॅजा मिया रोड, जळगाव येथे
कार्यक्रमास उपस्थित रहावे असे संस्थापक अध्यक्षा सौ राजेश्री नेवे यांनी कळविले आहे .