भुसावळ (प्रतिनिधी )-
दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पात शुक्रवारी आमदार संजय सावकारे यांनी आढावा बैठक घेत प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना तातडीने रोजगार द्यावा, अशी सूचना केली. सीएसआर संदर्भात स्वतंत्र कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो मंजूरीच्या अंतीम टप्प्यात असल्याने आमदार संजय सावकारे यांनी या कामांना तातडीने मार्गी लावावे, लवकरात लवकर पूढील प्रक्रिया करून कामे सुरु करावीत, अशा सूचना प्रसंगी दिल्या. दीपनगरच्या प्रदूषणामुळे बाधीत असलेल्या 14 गावांमध्ये सीएसआर निधीतून लवकरच विकासकामे होणार आहेत.
यावेळी प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, भेलचे जावडेकर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, माजी सभापती राजेंद्र चौधरी, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते. दीपनगर प्रदूषणाने बाधीत असलेल्या गावांना सीएसआर फंडातून विकासकामे मंजूर करण्यात आली होती. मात्र या सर्व कामांची एकत्रीत निविदा काढण्यात आली होती. यावर ग्रामपंचायतींनी हरकत घेतली होती. छोट्या ठेकेदारांनाही समावेश मिळावा, यासाठी विरोध दर्शविण्यात आला होता. यानुसार आता स्वतंत्र कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो मंजूरीच्या अंतीम टप्प्यात आहे. अधिकार्यांनी याबाबत माहिती दिली. यावर आमदार संजय सावकारे यांनी या कामांना तातडीने मार्गी लावावे, लवकरात लवकर पूढील प्रक्रिया करुन कामे सुरु करावीत, अशा सूचना दिल्या. यासह दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पाच्या इतर कामांचा आढावा घेतला. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असेही आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. याबाबत अधिकार्यांनी सकारात्मकता दर्शवली
दीपनगर 660 मेगावॅट केंद्रात स्थानिकांना रोजगारप्रश्नी मनसेचे शहराध्यक्ष विनोद पाठक, पदाधिकारी मंगेश भावे यांनीही मागणी केली होती. याबाबत त्यांनी आमदारांनाही निवेदन दिले होते.



