नियमांचे पालन करीत आनंदाने बकरी ईद साजरी करा : नियम मोडणाऱ्यांविरुद्ध होईल कायदेशीर कारवाई – पोलीस निरीक्षक दिलीप भागवत :


भुसावळ (प्रतिनिधी )-
नियमांचे पालन करीत सर्व मुस्लिम बांधवानी आनंदाने बकरी ईद साजरी करा असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले .
गोहत्या बंदीनंतर कोणत्याही प्रकारच्या अवैध जनावरांची हत्या करू नका नियम मोडणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या निर्देशांचे पालन करा. कुर्बानी करीता स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या अधिकृत जागेचा उपयोग करा , व नियमांचे पालन करावे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिस विभागातर्फे देण्यात आला .
बकरा ईद व कुरबानीच्या पार्श्वभूमिवर गुरुवार दिनांक 7 रोजी बाजार पेठ पोलिस ठाण्यात भुसावळ कुरेशी समाजा समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मार्गदर्शन केले . तसेच
बेकायदा जनावरांचा बळी देण्याची गरज नाही –
आपल्या सण आणि बलिदानांमुळे कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी सर्व कुरेशी बांधवानी घ्यावी, बेकायदेशिर जनावरांची हत्या करु नका असे आवाहन अखिल भारतीय जमीअतुल कुरेशी यांचे जळगाव जिल्हाध्यक्ष ए. जलील रहमान कुरेशी यांनी केले . सर्व नियमांचे पालन समाजाच्यावतीने केले जाईल अशी ग्वाही देवून कुरेशी समुदायाला सूचना केली की कचरा व पदार्थ इकडे तिकडे टाकू नका, नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या ट्रॅक्टर वा ट्रॉलीमध्ये किंवा खोल खडड्डा खोदा व त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावा असे आवाहन रेहान जलील कुरेशी यांनी समाजाला केले .
यावेळी मेहबूब कुरेशी, जब्बर कुरेशी, रेहान जलील कुरेशी आणि सर्व भुसावळ कुरेशी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *