इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रक्तदान शिबीर


भुसावळ –

डॉक्टर दिना निमित्त येथील आयएमए हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ च्या वतीने सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यांच्या ह्या सेवाकार्याचा गौरव केला. हया प्रसंगी डॉ. विरेंद्र झांबरे डॉ. महाजन, डॉ. संजय नेहेते डॉ. सुवर्णा सोनार . डॉ. पियुष नेहेते डॉ दिपक जावळे यांचा सत्कार केला. या प्रसंगी क्लब च्या प्रेसिडंट वंदिता पारे
सेक्रेटरी अलका भटकर कमल सचदेव नुतन फालक मनिषा काबरा उपस्थित होत्या.
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर
वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रीयांसाठी, समाजासाही उपयोगी कार्य
करीत असते. 1 जुले पासुन नविन वर्षाची सुरवात होते
1 जुलै डॉक्टर डे च्या निमित्ताने सर्व डॉक्टरां चा गौरव म्हणून
हा दिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर सतत आपल्या आरोग्याची काळजी घेतात . हया कोविड19 च्या भयावह
काळात सतत सर्व लोकांच्या आरोग्याची खरी काळजी डॉक्टरांनी घेतली. त्यांच्या हया कार्याला खरच सलाम, कोरोना योध्याची महत्वपूर्ण सर्व समाजाची जबाबदारी डॉक्टरांनीच घेतली त्यांची हि सेवा खरंच वाखाणण्याजोगी आहे असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *