मुंबई –
राज्यातील सर्व गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या गणपती बाप्पाचे सप्टेंबर महिन्यात आगमन होणार आहे. या बाप्पाच्या उत्सवासाठी काय निर्बंधलावले जातील याची साऱ्यांनाच उत्सुकता होती.

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांचा यंदाही हिरमोड झाला असून राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.
कसा असेल 2021 चा गणेशोत्सव:
▪️ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
▪️ सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती 2 फुटांचा असावा.
▪️ गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.
▪️ शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावं.
▪️ नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये.
▪️ सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबवावेत.
▪️ आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
▪️ नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी.
▪️ गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी.
▪️ विसर्जनाआधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी.
▪️ एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
दरम्यान, सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.


