भुसावळ –
रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आणि हावडा दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. माहिती पुढे दिलेल्यानुसार:

विशेष क्रमांक 02470 ही गाडी हावडा येथून दि. ०२.०७.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक शुक्रवार रोजी १४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई ला २३.०० वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन क्रमांक 02469 छत्रपती शिवाजी महाराज मुंबई येथून दि. ०४.०७.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक रविवार रोजी ११.०५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्या दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, नासिक रोड, भुसावल, अकोला, बडनेरा, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खड़गपुर और संतरागाछी (फक्त 02469 करीता)
संरचना : 2 एसी टू टियर, 3 एसी थ्री टियर, 12 स्लीपर क्लास, 2 सेकेंड क्लास सीटिंग, एक पेंट्री कार।
आरक्षण : 02469 चे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. ३०.६.२०२१ रोजी सुरू होईल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


