भुसावळ –
तालुक्यातील कुर्हा येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी बुधवारी सकाळी कारवाई करीत दोघांना अटक केली. बसस्थानकाजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता बापूराव गोविंद बोरसे हा सट्टा खेळताना आढळला. आरोपीकडून एक हजार 550 रुपये तसेच दीपक शिवाजी गायकवाड यांच्याकडूनही पोलिसांनी एक हजार 150 रुपये आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, युनूस शेख, विठ्ठल फुसे, राजेंद्र पवार, उमेश बारी, राहुल महाजन यांनी ही कारवाई केली.



