भुसावळ (प्रतिनिधी )-

रेल्वेने भुसावळ बांद्रा टर्मिनस दरम्यान सध्याच्या मार्गावर विशेष गाड्यांची सेवा पुढील सुचना मिळेपर्यंत पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहेः
09014 भुसावळ बांद्रा टर्मिनस (खान्देश) विशेष दि. २९.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू.
09013 बांद्रा टर्मिनस भुसावळ (खान्देश) विशेष दि. २९.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू.
आरक्षण : 09013/09014 विशेष गाड्यांची साधारण शुल्कासह बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्य स्थानकांदरम्यान सर्व विशेष मानदंड, कोविड-१९शी संबंधित एसओपीचे पालन करावे लागेल. या विशेष गाड्यांमध्ये चढण्यासाठी फक्त कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी असेल.
— —


