पिंप्रीसेकमला 73 हजारांची गावठी दारू नष्ट ; भुसावळ तालुका पोलिसांचे धाडसत्र सुरु ;

भुसावळ –

तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील नाल्याजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तालुका पोलिसांनी छापा टाकत 73 हजार 400 रुपये किंमतीचे एक हजार 800 लीटर रसायन नष्ट करीत 60 लीटर गावठी दारू जप्त केली.

संशयित आरोपी अशोक धनसिंग तायडे यांच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवार २३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, श्याम कुमार मोरे, विठ्ठल भुसे, प्रेमचंद सपकाळे, जितेंद्र साळुंखे, होमगार्ड निलेश सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *