लग्नाच्या आमिषाने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार –

भुसावळ –
लग्नाचे आमिष दाखवत तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला मात्र लग्नास नकार देण्यात आल्याने तरुणीने वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी दिनेश उर्फ दिनकर मोतीराम कुंभार टहाकळी, ता.भुसावळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
२४ वर्षीय तरुणी शेती काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करते. पीडीत तरुणीची आरोपीशी ओळख झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवत अनेकवेळा अत्याचार केला व लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर नकार दिल्याने तरुणीने पोलिसात धाव घेतली.
डीवायएसपी विवेक लवांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *