भुसावळ –
खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस भुसावळ तालुका काँग्रेस कमेटीतर्फे संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप भैय्या पाटील यांच्या आदेशाने काळ्या कायद्याची प्रसंगी होळी करण्यात आली.
भुसावळात काळ्या कायद्याची होळी
केंद्रातील भाजपा सरकारच्या किसान विरोधी काळ्या विधेयकाविरूद्ध आंदोलन करण्यात आले. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करून काळ्या कायद्याची होळी करण्यात आली तसेच भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तालुकाध्यक्ष पंकज पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस बंटी भैय्या, रहिम कुरेशी, महिला तालुकाध्यक्ष कल्पना तायडे, शैलेश बोदळे, पंचायत राज्य तालुकाध्यक्ष विवेक नरवाडे ‘अनवर तडवी, आदिवासी शहराध्यक्ष ईस्माइल पहेलवान, मीनाक्षी जावरे, प्रवीणसिंग पाटील, नितीन पटाव, रवी पाटील, अतुल चौधरी, जगपालसिंह गील, आकाश चुटीले, अशफाक काझी, सागर कुरेशी आदींची उपस्थिती होती.
यावल काँग्रेसतर्फे संकल्प दिवस
यावल : इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कदीर खान, हाजी गफ्फार शाह, अनिल जंजाळे, अजय बडे, नगरसेवक मनोहर सोनवणे, चंद्रकला इंगळे, इम्रान पहेलवान, रहेमान भाई, शेख जाकीर, सैय्यद ईखलास, बशीर तडवी, शेख नईम, मसरूर भाई, नदीम पटेल, सुलतान भाई, रहेमान बिल्डर, राजु पिंजारी, प्रसन्न महाजन, विनोद पाटील, विक्की गजरे, शेख सकलेन, उस्मान खान, नाना तायडे, हुसेन बिल्डर, अयाज सेठ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुक्ताईनगरात खासदार राहुल गांधीचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा
मुक्ताईनगर –
मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित खासदार राहुल गांधीचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात आला
याप्रसंगी मुक्ताईनगर उप रुग्णालय येथे जाऊन फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला तसेच सर्व पदाधिकारी यांनी येत्या काळात राहुल गांधीची गरज देशाला असल्याची जाणीव जनतेला करून देऊन त्यादृष्टीने जनमाणसात जाऊन काँग्रेसचे महत्त्व पटवून देऊ असा निर्धार व्यक्त केला सदर प्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर जगदीश दादा पाटील एड.अरविंद गोसावी बी डी गवई साहेब,एस ए भोईसर, प्रा. सुभाष पाटील सर (मेळसांगवे),शरद महाजन, नामदेव काका भोई, अनिल वाडीले, ,प्रा. पवन खुरपडे (शहराध्यक्ष काँग्रेस),एड.राहुल पाटील, दिनेश पाटील, राजू जाधव, नीरज बोरखेडे(विधानसभा अध्यक्ष) निखिल चौधरी, शिवाजी पाटील प्रकाश रोठे, गजानन पवार, एड. कुणाल गवई, राहील आसिफ खान, महेश खुळे, शेख भैय्या, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.




