जळगाव :
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही घटू लागला असल्याने दिलासादायक बाब आहे. आज दिनांक १६ बुधवार रोजी दिवसभरात ६३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १४४ कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार ७२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३७ हजार ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०३, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०६, भडगाव-००, धरणगाव-१०, यावल-०३, एरंडोल-०४, जामनेर-०३, रावेर-०५, पारोळा-०४, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०३ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.




