लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात वृक्षारोपण ;


 भुसावळ –

लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सतिश शिंदाडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलींद कांबळे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते वृक्षारोपण करून सुरूवात करण्यात आली. यानंतर महाविद्यालयातील सर्व अध्यापक व कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. यात बकुळ, निंब, गंभारी या सारख्या विविध प्रकारच्या १२० आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी उपस्थितांनी कोरोना संबंधीत शासनाने सर्व नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे अधिकारी डॉ.स्वप्निल रावेरकर, सहाय्यक अधिकारी डॉ.राहुल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *