वरणगांव भाजपा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर ;
वरणगांव –
वरणगाव भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कार्यकारणी आज माजी मंत्री आ.गिरिष महाजन , भाजपा जिल्हाअध्यक्ष आमदार राजुमामा भोळे,भाजपा खासदार रक्षाताई खडसे,माजी कृषी मंत्री आ.संजय सावकारे यांच्या मार्गदर्शना नुसार भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.प्रणिता पाटील चौधरी यांनी माजी ग्रा.पं. सदस्य सौ.रुख्मिणी काळे, माजी नगरसेविका सौ.माला ताई मेंढे,मा.नगराध्यक्ष सुनील काळे,शहराध्यक्ष सुनील माळी, कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ऍड.ए.जी.जंजाळे,सरचिटणीस गोलू राणे,हितेश चौधरी, मिलींद भैसे,युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू ठाकरे,आकाश निमकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली

शहाराध्यक्षा सौ.प्रणिता पाटील-चौधरी,कार्याध्यक्ष पदी सौ.जयश्री संजीव अवतारे, उपाध्यक्ष पदी श्रीमती कस्तुराबाई इंगळे,उपाध्यक्ष पदी श्रीमती मंदाबाई थटार, उपाध्यक्ष फरीदाबी शेख नसीर,उपाध्यक्ष सौ.गणेरकर,सरचिटणीस पदी सौ.भाग्यश्री पाटील,सौ.वर्षा बढे,चिटणीस पदी सौ.संगिता माळी,सौ.मीराबाई चव्हाण, मोनबी शेख उस्तफा,सौ.सुजाता वंजारी,सौ. मीनाक्षी पालवे,शेख फरीदा, भूमजाज बी कार्यकारणी सदस्य म्हणून सौ.रूपाली काळे,नगरसेविका सौ.मालाताई मेंढे,तसेच शुभम अमोदकर,अझर उल्ला,साबीर कुरेशी यांच्यासह असंख्य महिलांनी व युवकांनी वरणगांव शहरात भाजपा सरकारच्या काळात झालेल्या प्रचंड विकास कामांना प्रभावित होऊन व यापुढे देखील सर्वांगिण विकास फक्त भाजपाच करू शकते या अनुषंगाने माजी मंत्री आ.गिरिषभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खा.रक्षाताई खडसे,माजी कृषिमंत्री आ.संजय सावकारे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.


