भुसावळात नालेसफाईला सुरूवात ; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना आले यश –


भुसावळ –
पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतरही शहरात नालेसफाई रखडल्याने संताप व्यक्त होत होता नालेसफाई होत नसल्याने नाल्याकाठच्या घरांमध्ये पावसाळ्यात पूराचे पाणी शिरण्याचे भीती व्यक्त केली जात होती. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर बुधवारपासून प्रत्यक्षात पंचशील नगरात नालेसफाईला सुरूवात करण्यात आली.
शहरातील नालेसफाई रखडल्याने वंचित बहुजन विकास आघाडीने पालिका प्रशासनासह आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नालेसफाई अभावी पावसाळ्यात पंचशील नगरासह नाल्याकाठी राहणार्‍या नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत होती मात्र कंत्राटदाराने बुधवारी प्रत्यक्षात कामाला सुरूवात केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी, भुसावळ नगरपरीषदेचे अधिकारी गौरव अहिरे, वसंत राठोड, प्रदीप पवार व लाला देवकर, भीमराव तायडे, वंचित बहुजन आघाडीचे भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे आदीं उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *