अपघातास कारणीभूत असलेली खडी पालिकेने लवकरात लवकर उचलावी – गोसेवकांची मागणी ; गोसेवकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खडी व रेती केली बाजूला ; गोसेवकांचे परिसरातील नागरिकांनी केले कौतुक ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील सिंधी कॉलोनी जवळील शनि मंदिर लगत असलेल्या रोड़वर पसरलेल्या रेती व खडी मुळे वारंवार गाड्या स्लिप होऊन
लहान मोठे अपघात घडत आहे .
नुकतेच दोन दिवसांपूर्वीच या पसरलेल्या रेती व खडीवरुन
एक महिला बचावली. यागंभीर बाबीकडे पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून अपघातास कारणीभूत असलेली खडी व रेती त्वरीत उचलावी अशी मागणी येथील गोसेवकांनी केली आहे . दरम्यान गोसेवकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पसरलेली खडी व रेती बाजूला केल्याने तुर्तास नागरिकांना दिलासा मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी गोसेवक रोहित महाले व सहकाऱ्यांचे कौतुक करीत आहे .
सिंधी कॉलोनी जवळील शनि मंदिर लगत आसलेला रोड़वरिल
रस्त्यावर पडून असलेल्या रेती मुळे दिनांक ११ जुन
रोजी सकाळी भरधाव वेगाने मोटार सायकलवरील महिलेस वाळूचा अंदाज न आल्याने त्याने जोरात ब्रेक मारला परिणामी गाडी स्लिप झाली बाजूला उभी असलेली महिलेवर धडकणार तेवढयात गाडी चालकाने नियंत्रण मिळवले नाहीतर मोठा अपघात घडला असता
गाडीचा मागे बस होती बसचालक यांनी सुद्धा प्रसांगवधान लक्षात घेवून क्षणात ब्रेक मारला नाहीतर मोठा अपघात घडला असता
दरम्यान आवाज झाल्याने मंदिरात असलेले भाविक बाहेर आले यावेळी गोसेवक रोहित महाले हे सुद्धा त्या ठिकाणी होते . घडला प्रकार लक्षात घेवून अपघाताचे कारण रस्त्यामध्ये पडलेली वाळू होती हे लक्षात आल्याने गोसेवक
रोहित महाले यांनी सूरज साळी. दुर्गेश झोपे.गौरव साळी यांच्या मदतीने या गोसेवकांनी स्वखर्चतून दोन फावडे विकत घेऊन ती खडी व रेती
रोडच्या कडेला सरकवण्यात आली. जेणे करून तिथे पुन्हा असा प्रकार होणार नाही परंतु पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ही रेती खडी हटवावी ज्यामुळे अपघात होऊन कोणाचा जीव जाणार नाही .अशी मागणी करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *