महादेवतांडा फाट्याजवळ रस्ता लूट ; वाहन चालक किरकोळ जखमी !

भुसावळ –

तालुक्यातील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी दरम्यान महादेव तांडा फाट्यावर रस्ता लुटीचे प्रकार सुरू असून यामध्ये काही वाहन चालक किरकोळ जखमी झाल्याचे सकाळी उघडकीस आल्याने अपडाऊन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की,दिनांक १३/६/२०२१ च्या मध्यरात्रीच्या सुमारास ११.३० वाजेच्या दरम्यान भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी जवळील महादेव तांडा फाट्यावर रस्ता लूट करणाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी खाट टाकून उर्वरित रस्त्यामध्ये दगड ठेवून जाणाऱ्या ट्रकच्या कांचा फोडून नुकसान केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.याबदरम्यान १५ ते २० दुचाकी मोटरसायकल स्वार सुद्धा कोरकोळ जखमी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी साधला संपर्क ….

रस्ता लुटीच्या प्रकरणा संदर्भात भुसावळ मधील लोकमतचे छायाचित्रकार हबीब चव्हाण यांच्याशी मोटरसायकल स्वार यांनी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली.यानंतर लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधून रस्ता लुटीबाबत माहिती दिली असता पोहचण्याचे सांगितले.अर्धा तास झाल्यानंतरही घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी न पोहचल्याने शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधतात जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी १५ मिनिटांत घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचले.

अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला …

महादेव तांडा फाट्याजवळ सुरू असलेली रस्ता लुटीचे माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळताच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता तब्बल १५ मिनिटात जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रधान इंगळे,निलेश धुगे,सुनील माळी,होमगार्ड पथक तसेच गावातील नागरिकांना सोबत हातात लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले.तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे वाहन पुढे व ट्रक, मोटरसायकल स्वार मध्यभागी तर गावकरी मागे चालत वाहने कुऱ्हा पर्यंत सुरक्षित सोडली.

रस्ता लूट सुरू असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाल्याने नागरिकांनी जामनेर वरून भुसावळकडे जाणारी वाहने अर्धा तास थांबवून पोलीस अधिकारी आल्यानंतर जाण्यास चालकांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *